मुंबई । राज्यात आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षक भरती लवकरच होणार आहे. तब्बल १० हजार शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने काम करण्याची संधी मिळणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षण विभागाने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र निवडलंय.
आता सरल पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तिसऱ्या भाषेचे पसंतीक्रम घेतला जाणार आहे.त्यानंतर गरजेनुसार शिक्षकांची कंत्राटी तत्वावर भरती केली जाणार असल्याची माहिती आहे
दरम्यान विद्यार्थ्यांची तिसऱ्या भाषेची पसंती घेऊन पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी ऑगस्ट उजाडेल असं सांगितलं जातंय. आता विद्यार्थ्यांना तिसरी भाषा कोणती निवडायची हे ठरवता येणार आहे. विद्यार्थ्यांनी ठरवल्यानंतर त्यानुसार किती शिक्षकांची कोणत्या विषयासाठी आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन ही भरती केली जाणार आहे.
Discussion about this post