सध्या सोने-चांदीचे दर गगनाला भिडत असल्याने ते खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे सोने चांदी दरात वाढ झाली आहे. मंगळवारी सोन्याचे दर कमी झाले होते; परंतु आज सोन्याचे दर वाढले आहे. तर आज चांदीचे दर देखील वाढले आहेत. १८ जून रोजी २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५४० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचे दर देखील चांगलेच वाढले आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी जाणून घ्या दर किती आहेत…
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर एक लाखांपार गेले आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला फटका बसत आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गुडरिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ५४० रुपयांनी वाढ झाली आहे.२४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,००,९१० रुपये खर्च करावे लागणार आहे. मंगळवारी २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी १,००,३७० रुपये खर्च करावे लागत होते.
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. २२ कॅरेट प्रति तोळा सोन्यामध्ये ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी ९२,५०० रुपये मोजावे लागणार आहेत.
तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात आज प्रति तोळा ४१० रुपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ७५,६९० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
तर आज भारतात चांदीचे दर देखील वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीचे दर स्थिर होते. पण आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत प्रति ग्रॅम १ रुपयांनी वाढ झाली असून १ ग्रॅम चांगीसाठी १११ रुपये मोजावे लागणार आहे. तर १ किलो चांदीत १००० रुपयांनी वाढ झाली असून खरेदी करण्यासाठी १,११,००० रुपये द्यावे लागणार आहेत.
Discussion about this post