12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबरआहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफर साठी भरती जाहीर केलीय, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक उमेदवार ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 26 जूनपर्यंत अर्ज करू शकतात.अर्ज केल्यानंतर, 1 ते 2 जुलै दरम्यान उमेदवार त्यांच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती देखील करू शकतात. एकूण 261 पदांसाठी ही भरती निघाली आहे.
पात्रता काय असावी?
स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्टेनोग्राफर ग्रेड सी साठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. त्याच वेळी, स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी अर्जदाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. कमाल वयोमर्यादेत, ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षे आणि एससी एसटी साठी 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
एसएससी स्टेनोग्राफर रिक्त जागा 2025: अर्ज करण्यासाठी किती फी भरावी लागेल? जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 100 रुपये फी ठरवण्यात आली आहे. महिला, एससी, एसटी आणि दिव्यांग अर्जदारांना अर्जाची फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.
अर्ज कसा करावा?
एसएससी ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होम पेजवर दिलेल्या अप्लाय लिंकवर क्लिक करा.
फोन नंबर आणि मेल आयडी टाकून नोंदणी करा.
अप्लिकेशन फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
Discussion about this post