मुंबई । इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ दिसून आली असून यामुळे सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहे. ते खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्नच सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. दरम्यान, आज सोने दरात घसरण झालीय. परंतु आज या दरवाढीला ब्रेक लागला आहे.
सोन्याचे दर कितीने घसरले?
आज सोन्याचे दर प्रति तोळा १,१४० रुपयांनी घसरले आहेत. आज २ कॅरेट १ तोळा सोन्याची किंमत १,००,३७० रुपये आहे. हे दर काल १,०१,५१० रुपये होते. यात घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८०,२९६ रुपये आहे. या दरात ९१२ रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ ग्रॅम सोन्याची किंमत १०,०३७ रुपये आहे. या दरात ११४ रुपयांनी घसरण झाली आहे. म्हणजेच १० तोळ्यासाठी ११४०० रुपयांची घसरण झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात १०५० रुपयांनी घट झाली आहे. आज २२ कॅरेट सोने ९२,००० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ८४० रुपयांनी घसरण झाली आहे. आज ८ ग्रॅम सोने ७३,६०० रुपयांवर विकले जात आहे.
१८ कॅरेट सोन्याचे दर
१८ कॅरेट सोन्याच्या दरात ८६० रुपयांनी घसरण झाली आहे. हे दर ७५,२८० रुपये झाले आहेत. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ६०,२२४ रुपये आहे. या दरात ६८८ रुपयांनी घट झाली आहे. सोन्याच्या दरात आज घट झाल्याने खरेदीदारांना मात्र दिलासा मिळाला आहे.
Discussion about this post