जळगाव । ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजप शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसला वापरून फेकून देणार असल्याचा दावा केला आहे. संजय राऊत यांच्या या टीकेचा आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील खरपूस समाचार घेतला.
त्यावर राऊत यांना केवळ बोलण्याचेच काम आहे. वेळ येईल, त्यावेळी सर्व लक्षात येईल,असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यूत्तर दिले. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राजकीय व्यभिचाराचा आरोप करण्यात आला होता. याविषयी पाटील यांना छेडले असता ते म्हणाले की, आम्ही आमची भूमिका वर्षभरापूर्वीच जाहीर केली होती. राष्ट्रवादी फुटण्याचा कार्यक्रम आता झाला आहे. त्यांचा आणि आमचा विषय वेगळा आहे. त्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच देता येईल.
त्यावेळी अजित पवार अर्थमंत्री होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कोरोनाचा काळ होता. ठाकरेंना प्रशासनाचा अनुभव नसल्यामुळे थोडेफार कमीजास्त झाले. पण यावेळी तसे होणार नाही. स्वतः एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अाम्हा सर्वांना तसे आश्वासनही दिलेले आहे त्यामुळे वाटा हा सारखाच असेल. त्यात काहीच गडबड होणार नाही, याची मला खात्री आहे.