बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सध्या भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीमअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. जर तुम्ही फ्रेशर्स असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवार (NATS)च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे nats.education.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. ()
सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. २० ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील अप्रेंटिस पदासाठीची ही भरती ४५०० जागांसाठी होणार आहे. तुमच्याकडे नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.
या अप्रेंटिसशिपचा कालावधी १२ महिन्याचा असणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्ही nats.education.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. तिथे स्वतः ला रजिस्टर करायचे आहे. त्यानंतर लॉग इन करावे. यानंतर तुमची सर्व माहिती भरावी. यानंतर निर्धारित शुल्क भरुन फॉर्म सबमिट करावा. या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
Discussion about this post