तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती ची जाहिरात अधिकृत SSC वेबसाइट – ssc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यानुसार आयोगाने एकूण २४०२ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांमध्ये कॅन्टीन अटेंडंट, जेई, फायरमन, स्टोअरकीपर, लिपिक, ग्रंथालय लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, उपरेंजर, यूडीसी (अपर डिव्हिजन लिपिक) अशा विविध पदांचा समावेश आहे.
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २ जूनपासून सुरू झाली आहे. आणि इच्छुक उमेदवार २३ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
भरतीसाठी पात्रता काय?
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता विहित करण्यात आल्या आहेत. काहींसाठी १० वी, काहींसाठी १२ वी आणि पदवी ही जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रता मागितली जाते. त्याच वेळी, पदानुसार वयोमर्यादा देखील वेगवेगळ्या प्रकारे निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबाबत अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.
अर्ज फी : सामान्य आणि ओबीसी अर्जदारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्याच वेळी, एससी आणि एसटी उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करता येईल.
अर्ज कसा करायचा
एसएससी ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
होम पेजवर दिलेल्या अर्ज टॅबवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि अर्ज भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
फी भरा आणि सबमिट करा.
Discussion about this post