नवी दिल्ली । दिल्ली एनसीआरमध्ये वातावरणात मोठे बदल पाहायला मिळत असून मुसळधार पावसासह वादळ ताशी ९६ किलोमीटर वेगाने वाहत होते. या वादळाचा परिणाम हवेत उडणाऱ्या इंडिगोच्या एका विमानावरही झाला असून विमान आकाशातच अडकलं. या विमानाचा व्हिडिओ व्हायरल झाले आहे.
रायपूरहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान क्रमांक 6E 6313 हे धुळीच्या वादळामुळे अडकले. जोरदार वादळामुळे विमानाचं लॅडिंग करण्यास अडचण निर्माण झाल्यानं विमानाला आकाशातच घिरट्या घालाव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांच्या मनात भीती भरली. या विमानातील घाबरलेल्या प्रवाशांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. विमानतळावर लॅंडिंग करता आले नसल्यानं विमानाला आकाशातच घिरट्या माराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
#WATCH | An IndiGo flight number 6E 6313 from Raipur to Delhi experienced turbulence due to a duststorm, prompting the pilot to climb up again when the aircraft was about to touch down at Delhi airport. The aircraft landed safely at Delhi airport after making many circuits in the… pic.twitter.com/TtDUwIH79b
— ANI (@ANI) June 1, 2025
यानंतर, हवेत अनेक वेळा प्रदक्षिणा घालल्यानंतर विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. यासंबंधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, पायलटला असे म्हणताना ऐकू येते की वाऱ्याचा वेग ताशी ८० किमी पर्यंत होता आणि त्यामुळे विमान उतरवण्यात अडचणी येत होत्या. काही वेळाने विमान सुरक्षितपणे उतरले.
Discussion about this post