राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. NHAI मध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात असून चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी तुम्हाला मिळणार आहे. ()
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. nhai.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचं आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जून आहे. त्यामुळे त्यापूर्वी तुम्ही अर्ज करावेत. याअंतर्गत ६० पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये बीई/बीटेक पदवी प्राप्त केलेली असावी.
एनएचएआयमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या नोकरीसाठी निवड झाल्यावर लेव्हल १०अंतर्गत ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्तादेखील मिळणार आहे. या नोकरीबाबत अधिसूचना तुम्ही वेबसाइटवर जाऊन पाहा. चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
जर तुम्हाला सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये कामाचा अनुभव असेल तर ही चांगली संधी आहे.ही नोकरी करताना तुम्हाला चांगला अनुभव मिळणार आहे. या अनुभवाचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होणार आहे. यामुळे तुम्हाला इतर अनेक ठिकाणी करिअर करण्याची संधी निर्माण होईल.
Discussion about this post