धुळे । धुळे जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ज्यात नराधम बापाने आईच्या डोळ्यासमोरच लेकाची हत्या केली.धक्कादायक म्हणजे हत्येनंतर मृतदेह शेतात पुरला. याप्रकरणी पोलिसांनी आई-बाप दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. सावत्र बापाचे नाव पंकज बागुल असे आहे.
सावत्र बाप पंकज बागुल याने दारूच्या नशेत अवघ्या दीड वर्षाच्या मुलगा कार्तिकचा जमिनीवर आपटून जीव घेतल्याची घटना धुळे तालुक्यातील रामी गावात घडली आहे. विशेष म्हणजे ही घटना मुलाच्या जन्मदात्या आई सुरेखा बापू सोनवणेच्या डोळ्यादेखत घडली. तब्बल १२ दिवसानंतर शनिवारी दुपारी जेव्हा पोलिसांनी शिवारातील एका शेतातून मृतदेह उकरून काढल्याने ही घटना उजेडात आली. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, पोलिसांनी सावत्र बापासह जन्मदात्या आईला अटक केली आहे,
सुरेखा बापू सोनवणे या महिलेचा पती हा मध्यप्रदेशात असून त्याच्याशी जमत नसल्याने ती आपल्या दीड वर्षाचा कार्तिकसोबत रामी गावात राहत होती, लामकानी गावातील रहिवासी पंकज बापू बागुल याचे सुरेखाशी प्रेमसंबंध जुळले, त्यानंतर सुरेखा मुलगा कार्तिक आणि पंकज बागुल हे तिघे सागर गुलाब गिरासे यांचे शेतात कामानिमित्त गेल्या चार महिन्यापासून राहत होते. सावत्र बाप पंकजने दारूच्या नशेत जन्मदात्या आईसमोरच दीड वर्षाच्या कार्तिकला जमिनीवर आपटून ठार मारले. नंतर कार्तिकचा मृतदेह बाजूच्या शेतात पुरला. बेपत्ता कार्तिकचा शोध सोनगीर पोलिसांनी सुरु केला आणि शेतातून त्याचा मृतदेह ऊकरून काढला, त्यानंतर सावत्र बाप व आईला सोनगीर पोलिसांनी अटक केली आहे.
Discussion about this post