जळगाव । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यानंतर जिल्ह्यात महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा राबता वाढला आहे. शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) नेते खासदार संजय राऊत हे आजपासून दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये आल्यावर राऊत तोंड काळे करून जातील, असा इशारा दिला होता.
आता मंत्री पाटीलांच्या टीकेला जळगाव दौऱ्यावर आलेल्या खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिल. जे कोणी म्हणताय ते नक्कीच महाराष्ट्रामध्ये कच्चे आहेत. तुम्हाला जे यश मिळालं ते सरळ मार्गाने मिळालेले नाहीत. तुम्ही जे जिंकलात ते लोकांना मान्य नाहीये, असा टोला त्यांनी मंत्री पाटील यांना लगावला.
जिल्ह्यात पालकमंत्री असताना महिलांना रस्त्यावर प्रसूती होण्याची वेळ येते. रुग्णवाहिका मिळत नाही उपचार मिळत नाही. मंत्री म्हणून तुम्ही राज्यात मिरवतात, राज्याचं तोंड काळ करण्याचाच काम तुम्ही करत आहेत.
Discussion about this post