Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 30, 2025
in जळगाव जिल्हा
0
बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद ; पालकमंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!

म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गटातील ‘पद्मालय’ महिला प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

जळगाव  । “बचत गटातील प्रत्येक महिला ही आपल्या घराची अर्थमंत्री आहे. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाला चालना द्या, पारदर्शकता ठेवा, आणि वेळेवर ऑडिट सादर करा. व्यवसायात विश्वासार्हता जपा. ‘लखपती दीदी’ होण्यासाठी फक्त कर्ज नाही, तर कल्पकता लागते,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गटातील ‘पद्मालय’ महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी हजारो बचत गट महिलांच्या उपस्थितीत पालकमंत्री पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

“बचत गट म्हणजे छोटा संसार, पण त्यात लपलेला असतो मोठा व्यापार. तुमचा व्यवसाय तुम्हीच ठरवा, नाविन्यपूर्ण उत्पादन घ्या आणि मार्केटिंग शिका. दर्जा टिकवा आणि ग्राहकांचा विश्वास जिंका,” असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, “बचत गट हा गावाचा खरा कणा आहे. आईनंतर सर्वात जास्त काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे बहीणच असते.” आपल्या भाषणातून त्यांनी बहिणीच्या मायेला साद घालून सभागृहात भावनिक लहर निर्माण केली.

म्हसावद येथे उभारणार ‘बहिणाई मार्ट’
महिला बचत गटांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने १ कोटी रुपयांच्या खर्चाने म्हसावद येथे ‘बहिणाई मार्ट’ उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

८७ लाखांचे धनादेश वाटप
वसंत वाडी, वडली, विटनेर, वावडदा, बिलवाडी, पाथरी-कुऱ्हाडदे, बिलाखेदा, वराड बु. व डोमगाव येथील महिला बचत गटांना ८७ लाख रुपयांचे स्वयंसहायता व गुंतवणूक निधीचे धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

‘लखपती दीदी’साठी जबाबदारी आवश्यक
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल म्हणाल्या, “महिला संधीचं सोनं करतात. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून उभा राहत असलेला ‘बहिणाई मार्ट’ हा जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरेल. लखपती दीदी बनण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा आणि जबाबदारीने व्यवसाय वाढवावा.”
या कार्यक्रमाला माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक राजू लोखंडे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे, माजी जिप सदस्य पवन सोनवणे, उपजिल्हा प्रमुख रवी कापडणे, अभियान व्यवस्थापक हरेश्र्वर भोई, सरपंच अनिल पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, समाधान पाटील, बचत गट अधिकारी रविंद्र सुरवंशी, शितल चिंचोरे, सचिन पाटील, संदीप सुरळकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील व मालुताई पाटील यांनी केले. प्रास्ताविक रवींद्र सूर्यवंशी यांनी, तर आभार विजया पाटील व संगीता पाटील यांनी मानले. लेखा-जोखा प्रतिभा पाटील यांनी सादर केला. यावेळी आशा पाटील, हिराबाई गोपाळ, सोनाली पाटील, पल्लवी जाधव व वंदना पाटील यांनी आपले प्रेरणादायी अनुभव कथन सादर केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नीट पीजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला अत्यंत महत्वाचा निर्णय; वाचा काय आहे?

Next Post

जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विविध पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विविध पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page