जळगाव | शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आजी / माजी सैनिकी मुलांचे /मुलीचे वसतिगृह जळगांव येथे प्रवेश प्रकीया सुरू करण्यात आलेली आहे. युध्द विधवा,माजी सैनिक विधवा, माजी सैनिक अनाथ पाल्यांना वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश आहे व आजी /माजी सैनिकांच्या पाल्यांना सवलीताच्या दरात प्रवेश देण्यात येत आहे.
आजी /माजी सैनिकांच्या पाल्यांना १५% जागा आरक्षित ठेवुन उर्वरीत जागांवर इतर नागरीकांच्या पाल्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
अधिक माहितीसाठी संजय रा. गायकवाड, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मो. नं. ८४५९६८७३८८ दूरध्वनी क्र. ०२५७-२२४१४१४, समाधान धनगर, अशासकीय वसतीगृह अधिक्षक मो. नं. ७३७८९४२३२७ व दूरध्वनी क्र. ०२५७-२२३३०८८ अधिक माहितीकरिता या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post