राज्यात यंदा मान्सून लवकर दाखल झाला. पहिल्याच पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला. या पावसामुळे मोठं नुकसान असून राज्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 22 प्राणी दगावले आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली. दरम्यान आता मान्सून मराठवाडा आणि विदर्भातपर्यंत पहोचला आहे.
कोकणात दाखल झाल्यानंतर मान्सून वेगाने पुढे सरकत संपूर्ण महाराष्ट्र व्यापताना दिसत आहे. मान्सून मराठवाडा आणि विदर्भात दाखल झाला. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्ये मान्सून दाखल झाला आहे. तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मान्सून पोहचला आहे. या सर्व जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे पुढील २ दिवसांत मान्सून आणखी प्रगती करण्याची शक्यता आहे. राज्यात आज आणि उद्या अनेक भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होत जाईल.
तर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाटमाथा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदीया जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Discussion about this post