धुळ्यात एका प्रशिक्षणार्थी पोलीस जवानाचा प्रशिक्षण केंद्रात मृत्यू झाला आहे. पंकज यशवंत घायवट (वय ४३ वर्ष) असे मृत्यू झालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थीचे नाव असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
मयत पंकज घायवट हा एक्स मॅन होता अशी माहिती समोर आली आहे. पनिशमेंट ट्रेनिंगमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. यामुळे पंकज सोबत असलेल्या पोलीस प्रशिक्षणार्थी जवानांनी एकच आक्रोश केला आहे. सोबतच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संबंधित अधिकाऱ्यांतर्फे मज्जाव करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे झाला आहे का असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका प्रशिक्षणार्थी पोलीस जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. छातीत दुखू लागल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या जवानाला हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात आहे. पनिशमेंट ट्रेनिंगमुळे या जवानाचा जीव गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Discussion about this post