हरियाणातील पंचकुला शहरामधून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात एकाच कुटुंबातील सात सदस्यांनी सामूहिक आत्महत्या केली. या ७ जणांनी वाहनातच बसून विष प्राशन केलं आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना गाडीतच सुसाईड नोट सापडली. त्यात कर्जाच्या ओझ्यामुळे आयुष्य संपवत असल्याचं उल्लेख केलेला आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मृतांमध्ये देहरादूनमधील रहिवासी प्रवीण मित्तल (४२), त्यांचे पालक, पत्नी आणि तीन मुले (दोन मुली आणि एक मुलगा) यांचा समावेश आहे. सर्वांचे मृतदेह घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंब आधी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. देहरादूनहून ते पंचकुलात गेले होते. कथा ऐकून परतल्यानंतर त्यांनी कारमध्येच सुसाईड केली.
प्राथमिक तपासात पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. त्यात आत्महत्येचे कारण आर्थिक अडचणी आणि कर्जबाजारीपणा असल्याचे नमूद केले आहे.प्रवीण मित्तल हे टूर आणि ट्रॅव्हल व्यवसायात होते, आणि व्यवसायातील तोट्यामुळे कुटुंबावर मोठे कर्ज झाले होते. या आर्थिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.
Discussion about this post