जळगाव :- मुक्ताईनगर परिसरातील येथील रहिवासी निवृत्त कृषी पर्यवेक्षक रामराव राजाराम पाटील (बावीस्कर, मूळ रा असोदा) यांचे वयाच्या ९२ वर्षी यांचे आज रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी सकाळी ८.४५ वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज रविवार , दि.२५ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता गट. नं. २८, प्लॉट नं.२७, स्टील फॅक्टरी मागे, मुक्ताईनगर कॉलनी येथील राहत्या घरून नेरी नाका वैकुंठधाम येथे निघणार आहे.
ते कृषी खात्यातीलन कृषी पर्यवेक्षक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांचे पश्चात पत्नी, १ मुलगी, २ मुले, जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे. ते नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातील सहाय्यक कुलसचिव प्रमोद पाटील व जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंपर्क विभागात कार्यरत शैलेश पाटील यांचे वडिल, जामनेर तालुक्यातील नेरी येथील केंद्रप्रमुख सौ. शुभांगी पाटील यांचे वडील तसेच मराठा विद्याप्रसारक संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक नरेंद्र करंदीकर, नाशिक येथील सौ शमिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यरत सौ. गिता ( शिंदे ) पाटील यांचे सासरे होत.
Discussion about this post