पुणे । वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणाची एकीकडे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे तर दुसरीकडे पोलिस यंत्रणेवरच संशयाची सुई फिरू लागली आहे. “पोलिस हगवणे कुटुंबाला वाचवत आहेत का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी IG जालिंदर सुपेकर यांची ऑडिओ क्लिप ऐकवत अनेक घक्कादायक खुलासे केले आहेत. हगवणे कुटुंबावर जालिंदरचा पाठिंबा असल्याचं त्यांनी दावा केला. यावर आता कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी प्रतिक्रिया देत आपली बाजू स्पष्ट केली.
हगवणे कुटुंबाने केलेल्या कृत्याबाबत निषेध व्यक्त करत जालिंदर म्हणाले, “मागील दोन वर्षांपासून माझी नियुक्ती प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात झालेली आहे. त्यामुळे कार्यकारी पोलिस दलातील कोणताही घटक माझ्या अधिपत्याखाली नाही. अशा परिस्थितीत मी कोणालाही सूचना देण्याच्या स्थितीतच नाही. हगवणे कुटुंबाबाबत मी कोणत्याही प्रकारची सूचना दिलेली नाही. उलट, त्यांनी केलेल्या कृत्याचा मी याआधीही निषेध व्यक्त केला आहे,” असे जालिंदर यांनी स्पष्ट केलं.
Discussion about this post