जळगाव । दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावी पास झालेले विद्यार्थी आता अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरत आहेत. दरम्यान, आता अकरावीच्या प्रवेशाची वेबसाइट काही दिवस बंद राहणार आहे.
काही तांत्रिक कारणांमुळे अकरावीची वेबसाइट बंद करण्यात आली आहे. यामुळे ११ वी प्रवेश प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.अकरावीच्या प्रवेशाचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
नवीन सूचनेनुसार, सोमवार, २६ मे रोजी, सकाळी ११ वाजता याला सुरुवात होणार आहे. याच दिवशी इयत्ता १० वीचे मूळ गुणपत्रक व लिव्हिंग सर्टिफिकेट दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना शाळांमध्ये मिळणार आहे. 3 जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून थोडा काळ थांबावं लागणार आहे.
अकरावी प्रवेश असे आहे वेळापत्रक…
– २६ मे ते ३ जून: प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी, प्राधान्यक्रम निश्चिती, अर्ज प्रक्रिया सुरू, कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदविणे, विद्यार्थ्यांना पसंतीक्रम, आरक्षण व गुणांनुसार महाविद्यालयांचे वाटप, प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी प्रवेश व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा. एकाचवेळी विद्यार्थी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी करू शकतील अर्ज (व्यवस्थापन, संस्था अंतर्गत, अल्पसंख्याक कोटा यासाठी नंतर असणार शून्य फेरी.)
– ५ जून: तात्पुरती गुणवत्ता यादी
– ६ व ७ जून: गुणवत्ता यादीवर हरकती दाखल करणे, त्यांचे ऑनलाइन निरसन
– ८ जूनः अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी, शून्य फेरीमध्ये महाविद्यालय निवड व वाटप, – २ ते ११ जून: शून्य फेरी प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चिती
Discussion about this post