धावती ट्रेन पकडू नये असं वारंवार प्रवाशांना सांगितले जाते. मात्र, दुर्दैव म्हणजे अजूनही काही जण तो दुर्लक्षित करतात आणि जीवाशी खेळ करतात. सध्या एका व्हायरल झालेल्या घटनेत एक प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो पण पुढे जे घडतं ते अतिशय थरारक होतं.
ही घटना कर्नाटकमधील एका रेल्वे स्थानकावर घडली. व्हिडिओमध्ये(Video) स्पष्ट दिसतं की,ट्रेन स्टेशनवरुन सुटते आणि तिचा वेगही वाढला जातो. दरम्यान एक काका धावत धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्नात असतात त्यासाठी ते धावत जातात आणि ट्रेनच्या डब्ब्याच्या दरवाजाला पकडतात आणि चढतात. मात्र, त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या पुढे असलेल्या दोघांचाही तोल जातो आणि दोघही धावत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर कोसळतात.
या घटनेचा व्हिडिओ स्टेशनवर उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये शूट केला होता. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर अपलोड केला आणि काही मिनिटांतच हा व्हिडिओ फेसबूक, इन्स्टाग्राम आणि एक्स(ट्वीटर) अशा प्रसिद्ध माध्यमांवर शेअरही झाला.अनेकांनी व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे.















Discussion about this post