सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. कृषी शास्त्रज्ञ भर्ती मंडळ (ASRB) ने भरतीची जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती परीक्षेद्वारे, कृषी संशोधन सेवा (ARS), विषय विशेषज्ञ (SMS) आणि वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (STO) पदांची भरती केली जाईल.
निवडलेल्या उमेदवारांना कृषी संशोधन सेवा, विषय विशेषज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक अधिकारी या पदांवर नियुक्त केले जाईल. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवार asrb.org.in या ASRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील.अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मे 2025 ही आहे.
किती जागा रिक्त आहेत?
या भरतीअंतर्गत 582 पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये कृषी संशोधन सेवा (ARS) साठी 458 पदे, विषय विशेषज्ञ (SMS-T6) साठी 41 पदे आणि वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (STO-T6) साठी 83 रिक्त पदांचा समावेश आहे.
अर्जाची फी किती आहे?
ASRB NET – सामान्य (UR) उमेदवार – 1000, OBC/EWS उमेदवार – 500, SC/ST/PWD/महिला/ट्रान्सजेंडर उमेदवार – 250
ASRB ARS – सामान्य (UR) उमेदवार – 1000, OBC/EWS उमेदवार – 800, SC/ST/PWD/महिला/ट्रान्सजेंडर उमेदवार – 0 (सवलत)
SMS आणि STO (T6) – सामान्य (UR) उमेदवार – 1000, OBC/EWS उमेदवार – 800, SC/ST/PWD/महिला/ट्रान्सजेंडर उमेदवार – 0 (सवलत)
कोण अर्ज करू शकतो?
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
नेट परीक्षेसाठी किमान वय २१ वर्षे असावे. तर, यासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.
एसएमएस/एसटीओ पोस्टसाठी वय २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
Discussion about this post