जळगाव : महायुती सरकार सत्तेवर येऊन आता बराच काळ लोटला. पण लाडक्या बहिण योजनेवरून श्रेय वाद काही सुटला नाही. यातच जळगावातील मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहीण योजनबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे या योजनेचे श्रेय शिवसेनेचे, एकनाथ शिंदे यांचे असल्याचा एक प्रकारे दावा केला.
लाडकी बहीण योजनेचे पैसे एकनाथ शिंदे यांनी सुरू केले, असे सभासद नोंदणी करताना महिलांना सांगा, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे. आपला दाढीवाला बाबा म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतात असा गुलाबराव पाटील यांचा दावा आहे.
पुरुषांपेक्षा महिलांनी ठरवलं तर महिला आघाडीची नोंदणी पुरुषांपेक्षा जास्त होऊ शकते. सभासद नोंदणी करताना एवढेच सांगा की ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे चालू केले त्या एकनाथ शिंदे त्यांचा हा पक्ष आहे, असा सल्ला द्यायला सुद्धा मंत्री गुलाबराव पाटील विसरले नाहीत. पक्ष सदस्य वाढवण्याचा हा मंत्र कार्यकर्त्यांना लागू होईल अशी आशा त्यांना आहे. जळगावच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्ते पदाधिकार्यांना त्यांनी सभासद नोंदणीचे आवाहन केले.
बायकोने हात लावला तरी नमस्कार
इंग्रजांच्या काळात जसं एक अफवा पसरवणारा खात होतं तसेच अफवा निवडणुकीत लोकांनी पसरवल्या. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस लोकांनी मी निवडून येणार नाही अशा अफवा पसरवली होती. गुलाबराव पाटलांचा काही खरं नाही…मराठा बौद्ध मुस्लिम समाज मला मतदान करणार नाही अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या, असे पाटील म्हणाले.
Discussion about this post