धुळे । राज्यातील अनेक ठिकाणी मागच्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस सुरु असल्यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झाले असून यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण ऐन कांदा काढणीच्या वेळी पाऊस येत असल्याने कांदा पाण्यात सापडून खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाने धुळे जिल्ह्यात देखील जोरदार हजेरी लावली आहे. यातच साक्री तालुक्यातील देश शिरवाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाने झोडपले असून या परिसरात शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णतः भिजल्यामुळे सडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय या कांद्याला कवडीमोल भाव मिळण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
कांदा काढणीयोग्य झाल्याने कांद्याची काढणी करून त्याला मार्केटमध्ये नेण्यापूर्वी काढून ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांनी शेतात सुकवण्यासाठी काढून ठेवलेला कांदा सुकण्या आधीच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामध्ये भिजून हा कांदा पूर्णतः सडला आहे. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढून ठेवलेले कांदे हे शेतातच पडलेले असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदे अक्षरशः सडून गेले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभं ठाकल असून नुकसानग्रस्त शेतीची प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.
Discussion about this post