सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे इंडस्ट्रीय डेव्लपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच आयडीबीआयने भरती जाहीर केली आहे. ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरती मोहिमेत एकूण ६८६ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बॅचलर पदवी असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आयडीबीआय बँकेची(IDBI Bank Bharti) ही भरती महाराष्ट्रात होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे. या परीक्षेची संभाव्य तारीख ८ जून ०२५ असेल. आयडीबीआय बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गासाठी १०५० रुपये शुल्क आहे.
आयडीबीआय बँकेतील या नोकरीसाठी २० ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्टद्वारे होणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी, पर्सनल इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट होणार आहे.
Discussion about this post