तुम्हीही सरकारी बँकेत अधिकारी पदाच्या नोकरीच्या शोधात असाल तर युनियन बँक ऑफ इंडियाने नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार https://www.unionbankofindia.co.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया जाणून घेऊ शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२५ पर्यंत आहे.
रिक्त पदांची माहिती
१) असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) – २५० पदे
२) असिस्टंट मॅनेजर (आयटी) – २५० पदे
या भरतीमध्ये २०६ पदे सामान्य प्रवर्गासाठी, ५० पदे इडब्ल्यूएस प्रवर्गासाठी, ३६ पदे एसटी, १३४ पदे ओबीसी प्रवर्गासाठी आणि ७४ पदे एससी प्रवर्गासाठी राखीव आहेत.
वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय २२ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे. यात राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
१) असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) पदासाठी उमेदवाराकडे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि बीसीए/ सीएमए/ आयसीडब्ल्यू/सीएस असणे आवश्यक आहे.
किंवा
एमबीए/ एमएमएस/ पीजीडीएम/ पीजीडीबीएम या फायनान्स पदवीत किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
२) असिस्टंट मॅनेजर (आयटी) पदासाठी उमेदवाराकडे बीई/ बीटेक/ एमसीए/ एमएसी (आयटी)/ एमएस/ एमटेक/ कॉम्युटर सायन्स इंजिनिअरिंग/ आयटी/ इलेक्ट्रॅनिक्स/ इलेक्ट्रॅनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ डेटा सायन्स/ मशीन लर्निंग आणि एआय सायबर सिक्युरिटी विषयात पाच वर्षांची इंटिग्रेटेड एम.टेक पदवी असणे आवश्यक आहे.
उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेतून पात्रतेशी संबंधित इतर तपशील सविस्तर तपासू शकतात.
पगार
या पदासाठी दरमहा ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळेल.
Discussion about this post