इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज ५ मे रोजी दुपारी १ वाजेनंतर जाहीर करण्यात आला आहे. यानंतर आता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर १२ वीनंतर चांगले करीयर निवडण्याचा गहन प्रश्न असतो. बारावीनंतर करीयर निवडण्याचा मार्ग आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीशी निगडीत असायला हवा. दहावीनंतर सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स शाखेतून अभ्यास केला तर त्यानंतर तिन्ही शाखांमध्ये वेगवेगळे करिअर ऑप्शन आहे. बारावीनंतर तुम्ही कोणता करिअर ऑप्शन निवडायला हवा याबाबत थोडक्यात आम्ही तुम्हाला देणार आहोत.
वाणिज्य शाखा :
जर तुम्ही वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा दिली असेल तर तुम्ही सी.ए (CA) , बी.कॉम (B.com), सी.एस. फाउंडेशन (CS Foundation), बी.सीए (BCA), बी. आर्किटेक्ट (B.Arch) डी.एड पदवी (D.Ed) प्राप्त करु शकतात. याचसोबत तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मास्टर्स, एमबीए, एल.एल.बी. बी.एड, एम.एड पदवी प्राप्त करु शकतात. जर तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल तर बी.एड आणि एम.एड पदवी प्राप्त करावी.
कला शाखा :
कला शाखेतून जर तुम्ही बारावीची परीक्षा दिली असेल तर त्यानंतर तुम्ही डी.एड, एलएलबी, फॅशन डिझाइनिंग डिप्लोमा, इंटेरियर डिझाइनिंग डिप्लोमा, बी.ए, बी.बी.ए, एम.बी.ए पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच तुम्ही फॉरेन लँग्वेज डिप्लोमा करु शकतात. याचसोबत तुम्ही पुढे मास्टर्स करु शकतात. तुमच्याकडे मास्टर्स ऑफ मास कम्युनिकेशन करणे हा एक ऑप्शन आहे.
विज्ञान शाखा:
जर तुम्ही विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली असेल तर पुढे ग्रॅज्युएशन, मास्टर्स, आयटी (IT) अशा अनेक विषयात पदवी प्राप्त करु शकतात. तुम्ही एन.डी.ए (NDA) परीक्षा देऊन आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्समध्ये (Air Force) काम करु शकतात. यानंतर तुम्ही बॅचलर ऑफ प्लानिंग अँड डिझाइनमध्ये डिग्री प्राप्त करु शकतात. यानंतर तुम्ही बी.टेक करुन पुढे एमबीएदेखील करु शकतात. तुम्ही फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये जाईन एम.एस (MS) . करु शकतात. याचसोबत तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटदेखील करु शकतात. याचसोबत तुम्ही एमसीएम, एमसीएम पदवीदेखील प्राप्त करु शकतात.
Discussion about this post