सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. कोल्हापूर नगरपरिषदेत भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. फायरमन पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
कोल्हापूर नगरपरिषदेद्वारे या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य सरकारअंतर्गत भरती जाहीर केली आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. फायरमन पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८००० ते ५६,९०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
कोल्हापूर नगरपरिषदेत या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वीपास असणे गरजेचे आहे. याचचसोबत शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई येथून कोर्स पूर्ण केलेला असावा.या नोकरीसाठी तुमच्याकडे एम-एस सीआयटी कोर्स केलेला असावा.
या नोकरीबाबत सविस्तर माहिती ही अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२५ आहे. इच्छुकांनी आपला अर्ज मलकापूर नगरपरिषद, मलकापूर, जिल्हा कोल्हापूर येथे पाठवायचा आहे.
सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावेत. कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या नागरिकांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी मुदतीपूर्वी अर्ज पाठवायचा आहे.
Discussion about this post