पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज सोमवारी (दि.५) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली आहे.
यंदा घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.बारावी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व माहितीची प्रत प्रिंट आउट घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.
ऑनलाईन निकालानंतर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ६ ते २० मे पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.
ऑनलाईन निकाल पाहण्याठी अधिकृत संकेतस्थळ
१. https://results.digilocker.gov.in
२. https://mahahsscboard.in
3. http://hscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
Discussion about this post