जळगाव । मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. लवकरच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार असून, सध्याच्या १४ ते २० तासांच्या तुलनेत हा प्रवास केवळ ९ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष ही ट्रेन जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबेल. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना जलस आणि आरामदायी प्रवासाचा आनंद मिळेल.
मुंबई-नागपूर मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तयार झालेली ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी मजबूत करणार आहे. यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास काही तासात पूर्ण होणार आहे.
मार्ग आणि अंतर
नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे अंतर ८३७ इतके आहे. मुंबईहून नागपूरला पोहोचण्यासाठी साधारण १५ ते २० तास लागतात. मात्र, हे अंतर आता नऊ तासांत पूर्ण करता येणार आहे. वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांची ५ ते ६ तासांच्या वेळेची बचत होणार आहे.
प्रमुख थांबे
प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेन खालील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल:
वर्धा जंक्शन
बडनेरा जंक्शन
अकोला जंक्शन
भुसावळ जंक्शन
जळगाव जंक्शन
नाशिक रोड
कल्याण जंक्शन
दादर
Discussion about this post