पुणे । ‘राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून असून अशातच दहावी, बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
राज्यातील बारावीचा निकाल उद्या म्हणजे 5 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवारपासून (6 मे) महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.
तर दहावी परीक्षेचा निकाल १० ते १५ मे दरम्यान लागण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीचा निकाल तुम्हाला कोण-कोणत्या वेबसाइटवर पाहयला मिळणार हे घ्या जाणून….
– mahahsscboard.in
– mahresult.nic.in
– hscresult.mkcl.org
– msbshse.co.in
– mh-ssc.ac.in
– sscboardpune.in
– sscresult.mkcl.org
– hsc.mahresults.org.in
Discussion about this post