जामनेर । जमिनीची मोजणी होत नसल्याने खर्चाणे ता. जामनेर येथील शेतकरी बाबुराव बंडू पाटील यांनी भूमी अभिलेख कार्यालयाबाहेर आत्मदहनचा प्रयत्न केला. विशेष महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रम सुरु असतांना हा प्रकार घडला आहे.
गेल्या दोन महिन्यापासून भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी यांना वेळोवेळी अर्ज देवून तसेच जामनेर येथील कार्यालयात जावून देखील सबंधित अधिकारी विषय समजून घेत नाहीत. शेतजमिनीची मोजणी करण्यास टाळाटाळ करत आहे, असे बाबुराव पाटील यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात आज सकाळी झेंडावदंन कार्यक्रम सुरु असतांना त्यांनी आत्मदहनचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे उपस्थित पोलिसाने त्यांना रोखले
Discussion about this post