बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. असिस्टंट मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) या पदासाठी ही भरती सुरु असून या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
यूनियन बँकेत सरकारी नोकरी ()करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्जपप्रक्रिया ३० एप्रिलपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे ही शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने unionbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करावेत. तुम्हाला वेबसाइटवर डायरेक्ट लिंक मिळणार आहे.
आवश्यक पात्रता :
असिस्टंट मॅनेजर क्रेडिट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.CA/CMA(ICWA)/CS उत्तीर्ण उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. तसेच एमबीए/ एमएमएस/ PGDM/ PGDBM पदवी प्राप्त केलेली असावी. असिस्टंट मॅनेजर आयटी पदांसाठी अर्ज करणणाऱ्या उमेदवाराने बी.ई./ बीटेक/ एमसीए/ एमएससी (आईटी)/ एमएस/ एमटेक/ 5 वर्षांचा एमटेक कंप्यूटर सायन्स इंजिनियरिंग केलेले असावे.
यूनियन बँकेतील या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते ३० वयोगटात असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
Discussion about this post