केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राहुल गांधी यांच्यासह इतर राज्यांतील प्रादेशिक पक्षांनी केंद्र सरकारला अनेकदा घेरलं होतं. आता याचाच परिणाम म्हणून केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने आज बुधवारी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारत सरकारकडून कॅबिनेट बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत जातनिहाय जनगणना करणार असल्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारचा हा निर्णय सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास, समान प्रतिनिधित्वच्या दिशेत मोठा पाऊल मानलं जात आहे.
जातनिहाय जनगणनेमुळे समाजातील विविध समुदायांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती समोर येणार आहे. या निर्णयाने धोरणे आणि योजना अधिक चांगल्या पद्धतीने लागू करण्यास मदत मिळू शकते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, ‘कॅबिनेट बैठकीत आज ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. त्यात जातनिहाय जनगणना घेणार असल्याचा महत्वाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे’.
Discussion about this post