तुम्हाला वाहन चालविता येत असले आणि सरकारी नोकरीसाठी तुम्हीही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्टाफ कार वाहनचालक पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया २५ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज करण्यासाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांना ९ मे २०२५ पर्यंत अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीद्वारे न्यायालयाच्या मुंबईतील प्रधान आसनस्थानी एकूण अकरा पदे भरण्यात येणार आहेत.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार ९२ हजार ३०० पर्यंतचा मासिक पगार मिळणार आहे.
पदाचे नाव : वाहनचालक
पात्रता काय?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे वैध हलक्या मोटार वाहनांचा परवाना असावा. उमेदवाराने किमान तीन वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव घेतलेला असावा. याशिवाय वाहनांची दुरुस्ती व देखभाल तसेच मुंबई शहरातील भूगोलाची माहिती असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
उमेदवाराचे वय सामान्य प्रवर्गासाठी २१ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. मराठी आणि हिंदी भाषांचे वाचन, लेखन आणि संभाषण येणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क ५०० असून, ते ‘एसबीआय कलेक्ट’च्या माध्यमातून ऑनलाईन भरावे लागेल. अर्ज करताना दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. अधिकृत माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे जाहिरातीत नमूद करण्यात आले.
Discussion about this post