पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला असून त्यानंतर भारताने कठोर पावले उचलत पाच मोठे निर्णय घेतले. त्यात सिंधु पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच संतापला आहे. पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफ याच्यापासून ते विरोधी नेत्यांपर्यंत भारताला धमकवले जात आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे पाणी कमी केले किंवा थांबवले तर पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाणार असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान?
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या धाडसाला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. याबद्दल कोणीही चूक करू नये. पाकिस्तान २४ कोटी लोकांचा देश आहे. आम्ही आमच्या शूर सशस्त्र दलांच्या मागे नेहमी उभे राहणार आहे. हा संदेश स्पष्ट आहे. शांतता आमची प्राथमिकता आहे. परंतु आम्ही आमच्या अखंडतेशी आणि सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही असं म्हटलं आहे.
“कोणत्याही चुकीच्या कृत्याला किंवा धाडसाला उत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये,” असे शरीफ म्हणाले.
Discussion about this post