सामान्य रुग्णालय, जळगाव अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी भरती निघाली आहे. ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदासाठी ही भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
जळगाव जिल्ह्याकरीता, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये (मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, जळगाव, चाळीसगाव) येथे ही भरती होईल.
पात्रता काय?
१. पदवीधारक (कोणत्याही शाखेची)
२. टंकलेखन मराठी ३०, इंग्रजी ४०
३. एम.एस.सी.आय.टी.
४. किमान १ वर्षाचा अनुभव
पगार : १८०००
अटी व शर्ती
१. नियुक्ती हि मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने असेल
२. पदसंख्या कमी/अधिक करण्याबाबतचे आणि अर्ज स्विकारणे अथवा नाकारणे याचे अधिकार निवड समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
३. अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रांच्या छायांकित व साक्षांकीत प्रती, पासपोर्ट साईज फोटो व हस्तलिखीत अर्ज ज्यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक असावा.
४. अर्ज प्रत्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांचे कार्यालयात आवक-जावक विभागात सादर करावे इतर कोणत्याही मार्गाने अर्ज स्विकारले जाणार नाही.
५. अर्ज शासकीय सुट्ट्या वगळून, कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत स्विकारले जातील.
६. अर्ज स्विकारण्याचा कालावधी हा दि.२१/०४/२०२५ ते दि.२८/०४/२०२५
Discussion about this post