१०वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी तुमच्यासाठी. इंडियन बँकेत सध्या अटेंडेंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इच्छुकांनी indianbank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
इंडियन बँकेतील या नोकरीसाठी तुम्ही ३० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिसूचना वाचावी. त्यानंतरच अर्ज करावेत.
इंडियन बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
इंडियन बँकेतील या नोकरसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते ४० वर्षे असावी.या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.
तुम्हाला नोकरीसाठी अर्ज करताना अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने पाठवायची आहेत. इच्छुकांनी कागदपत्रे भारतीय बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, १४३/७३, पहिला मजला, रामलिंगनार मेन रोड, तिरुवन्नामलाई ६०६ ६०१, तमिळनाडू येथे अर्ज पाठवायचा आहे.या नोकरीसाठी स्थानिक उमेदवारांनी अर्ज करावेत.
Discussion about this post