सरकारी नोकरी शोधताय तर ही माहिती खास तुमच्यासाठी. आयआरसीटीसीमध्ये काम करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझ्म कॉर्पोरेशनमध्ये सध्या भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला त्वरित अर्ज करावा लागेल.
कारण अर्ज करण्यासाठी अवघे ४ दिवस उरले आहे. अर्ज करण्याची शेवटती तारीख २५ एप्रिल २०२५ आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.ही भरती मॅनेजर, असिस्टंट मॅनेजरसह अनेक पदांसाठी केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही irctc.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकता.
पात्रता काय?
आयआरसीटीमधील नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट, बीएससी, बी.टेक किंवा बीई (इंजिनियरिंग) डिग्री प्राप्त केलेली असावी.
आयआरसीटीसीमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही.तुमची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ६७००० रुपये पगार मिळणार आहे.
जर तुम्ही फ्रेशर्स असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही उत्तम संधी आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर लगेचच तुम्हाला चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदा होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत
आयआरसीटीसी (IRCTC) ही कंपनी भारतीय रेल्वेसाठी काम करते. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची सुविधा, नाश्ता, जेवण हे सर्व पुरवण्याचे काम आयआरसीटीसी करते. कॅटरिंगचा बिझनेस करणारी ही कंपनी आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तुम्हाला ही सुविधा मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीनंतर तुम्हाला अजून चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. हा अनुभव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल.
Discussion about this post