बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. विविध पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. bankofbaroda.in वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये जाऊन फॉर्म भरावेत. बँक ऑफ इंडियामध्ये एकूण १४६ रिक्त पदांवर भरती करण्यात आली आहे.
ही पदे भरली जाणार?
डेप्युटी डिफेंस बँकिंग अॅडवायजर, प्रायव्हेट बँक रेडियंस प्रायव्हेट, ग्रुप हेड, टेरिटरी हेड, सिनियर रिलेशनशिप मॅनेजर, प्रोडक्ट हेल्थ, पोर्टफोलियो रिसर्च अॅनालिस्ट या पदांसाठी ही भरती करण्यात आली आहे.
कोण अर्ज करू शकतो?
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. २२ ते ५७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा
सर्वप्रथम तुम्हाला bankofbaroda.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर करिअर सेक्शनवर जाऊन भरती संबंधिक लिंकवर क्लिक करायचे आहे.
यानंतर डिपार्टमेंटची निवड करुन अर्जप्रक्रिया पूर्ण करा.
तुम्हाला निर्धारित शुल्क भरायचे आहे. या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये भरायचे आहे. तुम्ही ऑनलाइन शुल्क भरु शकतात. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने हे शुल्क भरु शकतात.
Discussion about this post