जळगाव : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून एप्रिलमध्येच मे हिटचा सारखे ऊन जाणवत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहे. दरम्यान जळगाव जिल्हाभरात आजपासून तापमान झपाट्याने वाढणार आहे. दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असताना तापमानाचा पारा ४४ अंशांवर जाण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. त्यामुळे २० ते २२ या तीन दिवसांत जळगावकरांना उन्हाचा भयंकर तडाखा सहन करावा लागणार आहे.
शनिवारी तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. रविवारपासून पुढच्या तीन दिवसांत तापमानाचा पारा ४४ अंशांवर जाईल, असा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. त्यासोबतच निरभ्र आकाश असणार आहे. त्यामुळे उन्हाची दाहकता असह्य करणारी ठरणार आहे.
मार्चपासूनच ‘ताप’दायक
यंदा मार्च महिन्यापासूनच अनेक भागांत तापमान वाढले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. त्यात आणखी भर पडणार असल्याने जळगावकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे.
Discussion about this post