मुंबई । अभिनेते महेश मांजरेकर घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी प्रस्ताव पाठविला असल्याचं म्हटलं आहे. आता त्यांच्या या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासमोर एक अट घातली आहे.
राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घ्यावी, त्यानंतर टाळी द्यायची हाळी द्यायची हे ठरवा असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान दोन्ही भावांकडून युतीचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण जुळणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या प्रस्तावावर नेमकं काय म्हणाले ?
मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. मराठी माणसाने मराठीसाठी एकत्र यावे. पण माझी एक अट आहे. लोकसभेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये उद्योग घेऊन जातात, तेव्हाच विरोध केला असता तर आज केंद्रात ते सरकार बसले नसते. महाराष्ट्राच्या हिताचे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात बसले असते.
त्याचवेळी कामगार कायदे कचऱ्यात फेकले असते. तेव्हा पाठिंबा द्यायचा आणि आता विरोध करायचा. परत तडजोड करायची; पण महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याच्या घरी जाणार नाही, घरी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, हे आधी ठरवा अन् मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा.
माझ्याकडून भांडणं नव्हतीच. पण जी काही होती ती मिटवून टाकली. पण महाराष्ट्राचे हित ठरवा. सर्व मराठी माणसाने ठरवायचे, माझ्यासोबत जायचे की भाजप, गद्दार सेनेसोबत जायचे? कुणासोबत जाऊन मराठी, हिंदुत्वाचे हित होणार आहे, ते ठरवा. मग काय तो पाठिंबा द्यायचा तो द्या.. बिनशर्त पाठिंबा दिला तरी चालेल. महाराष्ट्राचे हित ही एकच अट आहे. चोरांना कळत-नकळत पाठिंबा द्यायचा किंवा प्रचार करायचा नाही, ही आधी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घ्यायची. त्यानंतर टाळी द्यायची हाळी द्यायची.
Discussion about this post