राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET), UGC NET 2025 जून अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी 16 एप्रिल 2025 पासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे आणि पात्र उमेदवार 7 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील.
एनटीए जून २०२५ मध्ये ८५ विषयांसाठी संगणक-आधारित चाचणी घेईल. यूजीसी-नेट ही अशी परीक्षा आहे जी भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ‘सहाय्यक प्राध्यापक’ तसेच ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर’ साठी भारतीय नागरिकांची पात्रता निश्चित करते.
अर्ज शुल्क-
सामान्य श्रेणी – ११५० रुपये
ईडब्ल्यूएस आणि ओबीसी एनसीएल श्रेणी – ६०० रुपये
एससी, एसटी, दिव्यांग प्रवर्ग – ३२५ रुपये
आवश्यक पात्रता :
१. युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. (ओबीसी नॉन-क्रिमी लेयर/एससी/एसटी/पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०% गुण)
२. चार वर्षांची पदवी घेतलेले विद्यार्थी देखील NET ला बसू शकतात. चार वर्षांच्या पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना ज्या विषयात पीएचडी करायची आहे, त्या विषयात बसण्याची परवानगी आहे, मग त्यांनी चार वर्षांची पदवी कोणत्या विषयात घेतली असेल.
नेट परीक्षा कधी होणार?
परीक्षेच्या संभाव्य तारखांची माहिती देखील देण्यात आली आहे. NTA ने म्हटले आहे की NET परीक्षा २१ जून ते ३० जून दरम्यान होईल. तथापि, यामध्ये बदल शक्य आहेत. परीक्षेचा नमुना संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने असेल. ऑनलाइन अर्ज ugcnet.nta.ac.in या वेबसाइटद्वारे करता येईल.
असा कराल अर्ज?
उमेदवार UGC NET २०२५ जून अर्ज फॉर्मसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेल्या सोप्या चरणांचे अनुसरण करू शकतात.
अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट द्या.
होमपेजवर “UGC-NET जून-२०२५: नोंदणी/लॉगिन करण्यासाठी येथे क्लिक करा” बटणावर क्लिक करा.
“नवीन उमेदवार नोंदणी बटण” वर क्लिक करा.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळविण्यासाठी आवश्यक तपशील भरले.
आता दिलेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डने पुन्हा लॉग इन करा आणि उर्वरित माहिती भरा.
आवश्यक शुल्क भरा
Discussion about this post