देशभरात जिम दरम्यान हृदयविकाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच आता जिममध्ये व्यायाम करताना ५२ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये घडली. ही संपूर्ण घटना जिममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातमध्ये कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. ज्यात हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ५२ वर्षीय व्यक्तीचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना जिममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातमध्ये कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
हर्क्युलिस बनने की चाह सही पर शरीर की पुकार भी सुनिए 😪😪😪😪#MadhyaPradesh के #जबलपुर के गोरखपुर थाना इलाके के जिम में एक्सरसाइज के दौरान 52 वर्षीय यतीश सिंघई की हार्ट अटैक से मौत हो गई…#ShockingVideo #viralvideo #heartattack #Jabalpur #kuldeeppanwar pic.twitter.com/Xj0dkpgZyv
— Kuldeep Panwar (@Sports_Kuldeep) April 18, 2025
व्हिडिओमध्ये (Video) स्पष्टपणे दिसतं की, तो व्यक्ती जिममध्ये व्यायाम करत असतो. अचानक तो जिमच्या दुसरीकडे व्यायाम करण्यासाठी जात असतो. मात्र, अचानक तो खाली कोसळतो. त्याला पाहून जिम ट्रेनर त्याला उचलण्यासाठी जातो आणि जिममधील अन्य सदस्याही तिथे जातात.
पहिल्यांदा सर्वांना चक्कर येण्याचा प्रकार वाटतो. परंतु, काही सेकंदात सर्वांच्या लक्षात आलं त्या व्यक्तीला श्वास घेता येत नाही. त्यातील एकाने रुग्णवाहिका बोलावली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सर्व घटना पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
घडलेला हा प्रकार जबलपूरमधील गोरखपूरचा आहे. या घटनेचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावरील @Sports_Kuldeep या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. आतापर्यंत ही घटना पाहून लोकांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,”सध्या असे प्रकार खुप समोर येत आहेत” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”आरोग्याकडे नीट लक्ष द्यावे प्रत्येकाने” शिवाय काहींनी भावनिक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत
Discussion about this post