जळगाव । आम्ही जसे राजकीय पक्षाची लोक फोडतो तसं तुम्ही इंग्रजी शाळेचे विद्यार्थी फोडा असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला होता. ‘आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री महोदय ईडी,सीबीआय, आयटीच्या चौकशीचा ससेमिरा लावतात की काय असा टोला रोहित पवार यांनी गुलाबराव पाटलांना लगावला आहे. आता मंत्री गुलाबराव पाटीलांनी रोहित पवार यांच्यावर सणसणीत टोला लगावला आहे.
रोहित पवार इंग्लिश मीडियममध्ये शिकलेला व सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेलं पोट्ट आहे, त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते? असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, रोहित पवार इंग्लिश मीडियममध्ये शिकलेला व सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेलं पोट्ट आहे, त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते? पूर्ण भाषण ऐकलं नाही. अपूर्ण बुद्धीचा माणूस आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी आधी भाषण तपासून घ्यावे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावलाय. आता गुलाबराव पाटील यांच्या केलेल्या टीकेवर रोहित पवार काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Discussion about this post