धुळेः शिरपूर तालुका (सांगवी) पोलीस ठाण्याच्या पथकाने 24 गोणीत 480 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून हा अंमली पदार्थ नेमका कुठे पाठवला जाणार होता या दिशेने आता तपास सुरू झाला आहे.
शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात गांजाचा मोठा साठा असून त्याची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या निदर्शनास आणून देत असतानाच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून छाप्याचे नियोजन केले. त्यासाठी पोसई मिलींद पवार, हेकॉ अलताफ मिर्झा, प्रकाश भिल, मुकेश पावरा, रोहिदास पावरा, ग्यानसिंग पावरा, स्वप्नील बांगर, जयेश मोरे, सुनिल पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पवन गवळी, आरीफ पठाण, मयुर पाटील या पथकाने लाकड्या हनुमान गावाचे शिवारात मणिलाल इसमल पावरा याच्या शेतात असलेल्या कापडयांचे गाठोड्यात बांधुन ठेवलेला सुका गांजा मिळून आला.
याचे वजन केले असता एकूण 24 गोणीत 480 किलोग्रॅम वजनाचा गांजा प्रती किलो 7 हजार रुपये असा 33 लाख 60 हजाररुपये किंमतीचा गांजा मिळुन आला आहे. याबाबत पोहे कॉ. सागर ठाकुर यांनी दिलेल्या फिर्याद वरुन गुन्हा दाखल झाला असुन आरोपी मणिलाल पावरा याला अटक करण्यात आली. असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची दि. 15 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मिळाली आहे.
Discussion about this post