जळगाव | भारत सरकारच्या वतीने २५ जुलै ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत डिजिटल इंडिया सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या सप्ताह कालावधीत राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रमांची मालिका आयोजित केली जाईल. या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य नागरिक यांनी नोंदणी करावी. असे आवाहन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना प्रसारण केंद्राचे वरीष्ठ संचालक प्रवीण चोपडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
नोंदणी करणेसाठी www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. किवा https://www.nic.in/diw2023-reg/ या लिंक चा वापर करून सुध्दा नोंदणी करता येईल. नोंदणी केल्यावर एसएमएस/ई-मेलवर कार्यक्रमाविषयी सर्व अपडेट प्राप्त होतील.
भारताचे तंत्रज्ञान जगासमोर दाखवणे, टेक स्टार्टअप्ससाठी सहयोग आणि व्यवसायाच्या संधी शोधणे तसेच सर्व नागरिकांना प्रेरणा देणे डिजिटल इंडिया सप्ताह चे उद्दिष्ट आहे. याद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध ई- गव्हर्नन्स सेवांबद्दल जाणून घेता येईल. आपल्या दैनंदिन जीवनात माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करता येईल. असे ही श्री.चोपडे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले.