महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठातील गट क संवर्गात भरती सुरु आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ही भरती करण्यात येणार आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भारतीद्वारे एकूण 529 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे चौथी, सातवी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
कृषी विद्यापीठातील गट क संवर्गात भरती सुरु आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. उमेदवार २५ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
कोणती पदे भरली जाणार?
प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, चौकीदार, माळी, व्हाॅलमन, मत्स्य सहायक व मजुर संवर्गाची एकूण ५२९ रिक्त पदे सरळसेवेने भरली जाणार आहेत.
किती पगार मिळेल?
प्रयोगशाळा परिचरचे वेतन श्रेणी एस ६ १९९०० – ६३२०० राहील. परिचरसाठी वेतन श्रेणी एस १ १५००० – ४७६०० राहणार आहे. चौकीदार, ग्रंथालय परिचर, माळी, मत्ससहाय्यक पदांसाठी वेतन श्रेणी एस १ १५००० – ४७६०० प्राप्त होईल. व्हॉलमन पदासाठी एस ३ १६६०० – ५२४०० ही वेतन श्रेणी मिळणार आहे. मंजुर पदासाठी नियुक्त उमेदवारांना वेतन श्रेणी एस ३ १५००० – ४७६०० प्राप्त होईल.
पात्रता काय असणार?
योगशाळा परिचरसाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. परिचरसाठी माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण असावे. चौकीदारसाठी ७ वी उत्तीर्ण असावे. ग्रंथालय परिचरसाठी शिक्षण १० वी पास, माळीसती शिक्षण कृषि विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. मजुर पदासाठी शिक्षण ४ थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय अन्य काही पदे भरती जाणार आहे.
या भरती मोहिमेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार. तर मागस प्रवर्ग/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणा आहे.
Discussion about this post