नवी दिल्ली । निवडणुकीशी संबंधित संघटना ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ADR) ने देशातील कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाला २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्वाधिक म्हणजेच २२४३ कोटी रुपयांहूनही अधिक देणगी मिळाली आहे. देशातील राष्ट्रीय पक्षांचा विचार करता हा आकडा सर्वाधिक आहे.
कोणत्या पक्षाला किती देणगी
एडीआर संस्थेच्या माहितीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात देशभरातली 12 हजार 547 दानकर्त्यांनी विविध राजकीय पक्षांना 2 हजार 577.28 कोटी रुपयांची देणगी दिली. यात भाजपला 2 हजार 343 कोटी, काँग्रेसला 281.48 कोटींच्या, ‘आप’ला 11.062 कोटी रुपये, माकपला 7.641 कोटी रुपये, एनपीईपीला 14 लाख 80 हजार रुपयाच्या देणग्या मिळाल्या.
महाराष्ट्रासह तीन राज्यांतून मिळाली सर्वाधिक देणगी :
भाजपला सर्वाधिक 989 कोटी रुपयांची देणगी एकट्या दिल्लीतून मिळाली. त्यापाठोपाठ गुजरातमधून 404.51 कोटी आणि महाराष्ट्रमधून 334.079 कोटी रुपये भाजपला देणगी स्वरुपात मिळाले. भाजपला मिळाली ही देणगी एकूण देणगीच्या निम्म्याहून अधिक आहे. त्यामुळे केवळ तीन राज्यांमधूनच भाजपची तिजोरी मालामाल झाली आहे.
Discussion about this post