धुळे : राज्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धुळ्यातही तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने प्रचंड उन्हाच्या झळा बसत आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाचा दूध उत्पादकांना फटका बसला आहे. वाढत्या उन्हामुळे दुभत्या जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरच परिणाम होऊ लागला असून जनावरांची दूध देण्याची क्षमता घटू लागली आहे.
धुळ्यात तापमान वाढीमुळे याचा परिणाम आता शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांवर देखील होताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरच याचा परिणाम होऊ लागला असून जनावरांची दूध देण्याची क्षमता घटू लागली आहे. त्यामुळे दुध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत असल्याने आता शेतकऱ्यांसमोर वाढत्या तापमानाचे देखील संकट उभे ठाकले आहे.
अवकाळी पावसामुळे यापूर्वीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून आता ज्या दुभत्या जनावरांच्या दुधावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यावर देखील आता वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन दुधात घट येत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून सूचना
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने यासंदर्भात शेतकऱ्यांना वाढत्या तापमानापासून आपल्या दुभत्या जनावरांच संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सातत्याने थंड आणि शुद्ध पाणी जनवरांना पाजावे. तसेच थंडावा असेल अशा ठिकाणी या जनावरांना बांधण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. अर्थात कृषी संवर्धन विभागाच्या सूचनांचे पालन करून आपल्या दुभत्या जनावरांचा वाढत्या तापमानापासून बचाव शेतकऱ्यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Discussion about this post