मुंबई । माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांना कोल्हापूर विद्यापीठाच्या वतीने पीएचडी प्रदान करण्यात आली असून यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दीपक सावंत यांचे कौतुक केले. तर त्याचसोबत त्यांनी विरोधकांना खडेबोल देखील सुनावले. विशेष एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मी डॉक्टर नसलो तरी अनेकांची मोठ मोठी ऑपरेशन केलीय, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपक सावंत यांचे कौतुक करताना सांगितले की, ‘दीपक सावंत यांचा प्रवास सर्वांनी पाहिला आहे. ते एक विश्वासू कार्यकर्ता आहेत. सोबत कोणी असेल तर मार्गदर्शन चांगलं होतं आणि अशी पदवीधर माणसं मिळतात. दीपक सावंत यांनी कोविड काळामध्ये जे काम केलं ते सर्वांच्या लक्षात आहे.’
उपमुख्यमंत्री यावेळी त्यांच्याबद्दल सांगताना म्हणाले की, ‘काही लोकांना माहीत नसेल मला देखील अर्ध्यातून शिक्षण सोडावं लागलं. बीए झालो मग फायनल करायला गेलो. २०२२ मध्ये ही परीक्षा सुरू झाली आणि ते राहून गेलं. राज्यात सर्व सामान्य माणसाचं हे सरकार स्थापन झाले. दीपक सावंतांनी आरोग्य विभागात चांगलं काम केलं. त्याच्या रूपाने एक दूरदृष्टी असलेला डॉक्टर शिवसेनामध्ये आहे याचा मला अभिमान आहे. कोविड काळातमध्ये काय होणार कोणालाच माहीत नव्हतं. पण दीपक सावंतांनी चांगले काम केले.’
एकनाथ शिंदे यांनी दीपक सावंताबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘तुम्हाला ही काही लोकांनी हलक्यात घेतलं. तसंच मला ही काही लोकांनी हलक्यात घेतलं होतं. तसा मी काही हलका नव्हतो. मी जरी डॉक्टर नसलो तरी मोठ मोठी ऑपरेशन मी केली आहेत. कोणाचा मानेचा पट्टा. कोणाचा कमरेचा पट्टा सरळ केला आहे. ‘, अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला.
Discussion about this post